Mumbai School Bomb Blast News : मुंबईत बॉम्बस्फोटाी धमकी! कांदिवली आणि गोवंडीतील शाळांनंतर अमेरिकन वकिलातीलाही धमकी

Mumbai School Bomb Threat News : तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल, ‘दिवीज प्रभाकर लक्ष्मी’ ई-मेल आयडी संशयाच्या केंद्रस्थानी
मुंबई | शहरात बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचं सत्र पुन्हा उफाळलं असून, कांदिवली आणि गोवंडी येथील दोन नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बस्फोट घडवण्याची ई-मेलद्वारे धमकी मिळाली आहे. Mumbai School Bomb Threat News याआधी बीकेसी येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासालाही फोनवरून अशीच धमकी आली होती. तिन्ही घटनांमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Mumbai Latest Crime News
कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील रायन इंटरनॅशनल स्कूलला शनिवारी “दिवीज प्रभाकर लक्ष्मी” नावाच्या ई-मेल आयडीवरून बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तांत्रिक तपासाद्वारे संबंधित व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीत ही धमकी खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे.
तसेच गोवंडीतील कनकिया इंटरनॅशनल स्कूललाही रविवारी याच नावाने बॉम्बस्फोटाची धमकी दिली गेली. देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. खोटी माहिती देऊन भीती पसरवल्याबद्दल संबंधितांवर भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, बीकेसी येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासालाही एका अज्ञात व्यक्तीने फोन करून परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॉम्ब शोधक पथक तैनात केले, मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही.


