सत्यजित तांबे यांची काँग्रेसवर घणाघाती टीका; थोरात म्हणाले, “बालिशपणा थांबवा, ऋण विसरू नका”
मुंबई | राजकीय चर्चांना हवा देणारे वक्तव्य करत आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेत्यांना थेट उघड आव्हान दिलं आहे. “महाराष्ट्रातील काँग्रेसचे कुणीही नेते एका तासात राहुल गांधींना भेटून दाखवा!” असे तांबे म्हणाले, आणि लगेचच या विधानाने काँग्रेसमध्ये खळबळ उडवली. त्याचबरोबर काँग्रेसच्या धोरणांवरही त्यांनी सडकून टीका केली.
तांबे यांच्या या टीकेमुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या विधानांना “बालिश” ठरवत परखड शब्दांत उत्तर दिलं. “तुमचं वय आता युवक काँग्रेसचं राहिलेलं नाही. काय, कुठे आणि कसं बोलायचं हे शिकायला हवं. राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल अशा प्रकारचं बोलणं म्हणजे कृतघ्नपणा,” असे थोरात म्हणाले.
थोरातांचे प्रत्युत्तर:
“काँग्रेसने सत्यजित तांबे यांना घडवलं. पक्षाने दिलेलं योगदान विसरणं हे लाजीरवाणं आहे. थोडं आत्मचिंतन करावं लागेल,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं. “तुम्हाला आता मोकळं वावरण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की ज्या पक्षाने उभं केलं त्याच्यावर टीका करावी,” असे थोरात म्हणाले.
तांबे यांच्या विधानामुळे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, पक्ष नेतृत्वाने लवकरच यावर कठोर भूमिका घेण्याचे संकेतही मिळत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…