Mira Road Crime News : अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला तरुणाला पोलिसांनी गुजरात मधून केले जेरबंद
Mira Road Latest Crime News : लग्नाला नकार देणाऱ्या अल्पवयीन तरुणीला अश्लील फोटो, व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपीला गुजरात मधून अटक
मिरा रोड :- लग्नासाठी नकार दिल्याने हाच राग मनात धरून आरोपीने अल्पवयीन तरुणीला instagram च्या बनावट आयडीवरून अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवले होते.अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने या संदर्भात मिरा रोड पोलीस ठाण्यात Mira Road Station तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बीएनएस कलम 78,79 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67,67(अ) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमन कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी आरोपीला गुजरात मधून ताब्यात घेतले आहे. आरोपी mr_deep_65 या नावाने बनावट इन्स्टाआयडी द्वारे अल्पवयीन तरुणीला त्रास देत होता.
मध्यवती गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून सुरु होता. गुन्हयाचे अनुषंगाने तांत्रीक विश्लेषण केले असता mr_deep_65 हा इंस्टाग्राम आयडी दिप विजयभाई सोळंकी, (वय 20, रा. बिपीन पारीख सोसायटी, गळखोळ पाटीया, अंकलेश्वर, गुजरात) याचा असल्याची प्राथमिक माहीती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक राहुल राख यांनी वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस हवालदार हनुमंत सुरेश सूर्यवंशी, राजवीरसिंग बोधासिंग संधु, अनिल रामदास नागरे या पोलीस पथकास अंकलेश्वर, गुजरात येथे रवाना केले. पथकाने स्थानिक पोलीस ठाण्याचे मदतीने आरोपीला गुरुवार (5 डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेवुन त्याचेकडे प्राथमिक तपास केला असता माहिती प्राप्त झाली की, ऑक्टोबर 2024 मध्ये यातील फिर्यादी यांचे मुलीसोबत आरोपी याचे लग्न ठरले होते. परंतु फिर्यादी व तिचे नातेवाईकांना आरोपी याचे चालचलन बरोबर नसून त्याचे यापूर्वी 3 मुली सोबत जमलेली लग्न तुटलेली आहेत अशी माहीती मिळाल्याने फिर्यादी महीला व तिचे नातेवाईकांनी त्यांचे ठरलेले लग्न मोडले होते. त्यामुळे त्याचा राग मनात धरून आपल्या मेव्हण्याच्या मोबाईलवर गुपचूपपणे mr_deep_65 या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून त्यावरून फिर्यादी यांचे अल्पवयीन मुलीचे मोबाईलवर अश्लील व्हिडीओ व मॅसेज पाठविले आहेत. त्यामुळे ताब्यातील दिप विजय सोळंकी याने गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यत घेवून पुढील कारवाई करीता मिरारोड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चंद्रे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार हनुमंत सुर्यवंशी, राजचिरसिंग संधू, अनिल नागरे, संतोष मदने, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, महेश वेल्हे, संग्रामसिग गायकवाड, प्रविणराज पवार, पोशि अकिल सुतार, साकेत माघाडे, नितीन राठोड, मयुब सचिन चौधरी, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.