•पुतळ्यावर लाल रंग टाकल्याचा संशय; पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत
मुंबई :- दादर येथील शिवाजी पार्क मैदानात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पुतळ्यावर कोणीतरी लाल रंगासारखा पदार्थ टाकल्याचा संशय असून, ही घटना काल रात्री घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवसैनिकांच्या ‘माई’ यांचा पुतळा; ठाकरे गटाच्या तक्रारीची वाट न पाहता पोलीस गुन्हा दाखल करणार
या संदर्भात ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. मीनाताई ठाकरे यांचे 1995 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी असल्यामुळे शिवसैनिक त्यांना अत्यंत आदराने ‘माई’ असे संबोधतात. या घटनेमुळे आता पोलिसांकडून तातडीने कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…