मुंबई

MCA Election : MCA निवडणुकीत अनोखी ‘क्रिकेट युती’! आव्हाड, नार्वेकरांच्या विजयाबद्दल प्रताप सरनाईकांनी केले अभिनंदन

Jitendra Awhad And Pratap Sarnaik : शरद पवार-आशिष शेलार गटाचा 16 पैकी 12 जागांवर विजय; राजकीय विरोधक क्रिकेटच्या मैदानात एकत्र

मुंबई :- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कार्यकारी समितीच्या त्रैवार्षिक (2025-28) निवडणुकीत अध्यक्ष अजिंक्य नाईक Ajinkya Naik यांच्या नेतृत्वाखालील ‘शरद पवार-आशिष शेलार’ Sharad Pawar-Ashish Shelar गटाने 16 पैकी 12 जागा जिंकत मोठे वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या निकालांमुळे राजकीय विरोधक क्रिकेटच्या मैदानात एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रमुख पदांवर विजय

बुधवारी पार पडलेल्या या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी निवडणुकीत आपल्या गटाचा विजय निश्चित होईल, याची विशेष काळजी घेतली. नाईक यांच्या गटातील प्रमुख नेत्यांनी सहज विजय मिळवला:

उपाध्यक्षपद: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड

सचिवपद: डॉ. उन्मेश खानविलकर

सहसचिवपद: निलेश भोसले

कार्यकारिणी सदस्य: ठाकरे गटाचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वाधिक लक्ष लागले होते, ज्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजय संपादन केला.

सरनाईक-नार्वेकर यांची चर्चा

राज्यात सरकारमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी स्थिती असतानाही क्रिकेटच्या निवडणुकीत मात्र नेत्यांची पुन्हा एकी पाहायला मिळाली. या विजयानंतर शिंदे गटाचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे एकेकाळचे शिवसेनेतील सहकारी आणि आता ठाकरे गटात असलेले मिलिंद नार्वेकर, तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत फोटो शेअर करत अभिनंदन केले आहे.

प्रताप सरनाईक यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले: “मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कार्यकारी समितीच्या त्रैवार्षिक (2025-2028) निवडणुकीत उपाध्यक्षपदी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर निवडून आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.”

पुढे सरनाईक यांनी म्हटले, “मुंबईचा क्रिकेट वारसा आणि परंपरा अधिक बळकट करण्यासाठी, नव्या नेतृत्वाखाली MCA आणखी उंच भरारी घेईल, याची खात्री आहे. खेळाडू, संघटना आणि चाहत्यांच्या हितासाठी एकत्र काम करण्याची ही संधी मुंबई क्रिकेटसाठी नवे पर्व ठरू दे हीच सदिच्छा.”

कोणे एके काळी एकाच शिवसेनेतील सहकारी असलेले सरनाईक आणि नार्वेकर यांची ही अनोखी युती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago