क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kalyan Chain Snacher Arrested : चित्रपटाप्रमाणे थरार! सोनसाखळी चोरीतील ‘वॉन्टेड’ सलमान इराणीला पकडताना पोलिसांना महिलांच्या झुंडीचा घेराव

Kalyan Chain Snacher Arrested : कल्याणच्या इराणी वस्तीत खडकपाडा पोलिसांची धडक; महिलांनी पोलिसांना जुमानले नाही, पण पोलिसांच्या गट्ट पकडीमुळे आरोपीला सोडवू शकल्या नाहीत

कल्याण :- ठाणे जिल्ह्याच्या विविध भागांत पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणारा कल्याणजवळील आंबिवली वस्तीमधील कुख्यात गुन्हेगार सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी याला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी आज चित्रपटातील थराराप्रमाणे इराणी वस्तीतून अटक केली. विशेष म्हणजे, या अटकेच्या वेळी इराणी वस्तीमधील महिलांनी नेहमीप्रमाणे झुंडीने पुढे येत सलमानला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

15 हून अधिक गुन्हे दाखल

सलमान जाफरी Salman Jafari हा सोनसाखळी चोरीतील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंबई, बदलापूर, मिरा भाईंदर, वसई, विरार, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 15 हून अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. Kalyan Latest Crime News

थरारक अटकेची कहाणी

काही दिवसांपूर्वी पनवेल येथे सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील रहिवासी असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली. पनवेल पोलिसांनी चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण खडकपाडा पोलिसांना दाखवले. चित्रणातील इसम हा सलमान जाफरी असल्याचे स्पष्ट झाले.

खडकपाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सलमान जाफरीवर इराणी वस्तीमध्ये पाळत ठेवली. तो घराबाहेर पडून फिरत असताना, ‘आपण त्याला पाहिलेच नाही’ असा अविर्भाव आणत पाळतीवर असलेल्या पोलिसांनी अत्यंत चालाखीने सलमानवर झडप घालून त्याला अटक केली.

महिलांचा झुंडीने पोलिसांना घेराव

सलमानला पकडताच इराणी वस्तीमधील महिला जमा झाल्या आणि त्यांनी सलमानला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून येण्यास सुरुवात केली. त्यांनी सलमानला सोडण्यासाठी आग्रही मागणी केली आणि आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सलमानभोवती घट्ट पकड केल्यामुळे महिलांना त्याला सोडवता आले नाही. सलमानच्या अटकेचा हा थरार इराणी वस्ती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी सलमानला पोलीस वाहनात बसवून खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले. वस्तीमधील काही महिलांनी पोलीस वाहनाचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. अधिक चौकशीसाठी सलमानला पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ठाणे आणि आसपासच्या परिसरातील सोनसाखळ्या चोरीचे गुन्हे इराणी वस्तीमधील आरोपींकडून होत असल्याचे या तपासामध्ये पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0