Shrirang Barne On Maval Lok Sabha Election
पनवेल : महायुतीच्या मित्र पक्षांनी मनापासून काम केले आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील Maval Lok Sabha Election सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के विजयी होणार असून दोन लाख ५० हजार ३७४ मतांनी विजयी होईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे Shrirang Barne यांनी व्यक्त केला. Shrirang Barn On Maval Lok Sabha Election
खासदार बारणे Shrirang Barne यांनी आज (मंगळवारी) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मावळमध्ये महायुतीची ताकद होती, आहे आणि राहील. ‘उबाठा’ची कोठेही ताकद नाही. शेकापची उरण, पनवेलला ताकद आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या सर्व आमदारांनी मनापासून काम केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार यांनीही काम केले आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत, चिंचवड, पिंपरी आणि मावळ या सहाही विधानसभा मतदारसंघात मला मताधिक्य मिळेल. मी शंभर टक्के निवडून येणार आहे. दोन लाख ५० हजार ३७४ मतांनी मी विजयी होईल. मागील दोन्ही निवडणुकीत माझा अंदाज खरा ठरला आहे. बूथनिहाय अंदाज काढला आहे, याकडेही बारणे यांनी लक्ष वेधले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या 3 लाख 22 हजार 700 मतांपैकी मला 2 लाख 5 हजार 683 मते पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात 2 लाख 95 हजार 973 मतदान झाले. त्यापैकी 1 लाख 76 हजार मतदान मला पडेल. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही, असा दावा खासदार बारणे यांनी केला. Shrirang Barn On Maval Lok Sabha Election
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे आदेश मानले नाहीत. काही प्रमाणात काम केले नाही. बाकी सर्वांनी मनापासून काम केले. राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त्यांनी काम केले असता तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले असते, असेही खासदार बारणे म्हणाले. आजपर्यंतच्या निवडणुकीत व्यक्तीगत आरोप कोणी केले नव्हते. पार्थ पवार, लक्ष्मण जगताप यांनीही व्यक्तीगत आरोप केले नव्हते. पण, संजोग वाघेरे यांच्याकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. त्यामुळे वाघेरे यांनी व्यक्तीगत आरोप केले, याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. Shrirang Barn On Maval Lok Sabha Election
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…