Matunga Police Arrested Chain Snacher : एकाच गुन्ह्यात दोन गुन्हेगार, दोन्ही गुन्ह्यांचा छडा आणि पूर्ण मुद्देमाल जप्त!
मुंबई, दादर | फूटपाथवरून चालत जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र हिसकावणाऱ्या टोळीचा अखेर माटुंगा पोलिसांनी छडा लावला आहे. Matunga Police Arrested Chain Snacher अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, विशेष म्हणजे दोन्ही गुन्ह्यांतील 100 टक्के सोन्याचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
‘मोजेस’ आणि साथीदाराचा गुन्हेगारी प्रवास संपला; पोलिसांचा गुप्त तपास चमकला!
18 मे 2025 रोजी दादर टीटीच्या दिशेने चालत असलेल्या महिलेला अज्ञात व्यक्तीने पाठीमागून गाठत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि गर्दीतून पलायन केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर लगेचच माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. Mumbai Matunga Police Latest News
या गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त माहिती, सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ओळखले आणि त्यांना सापळा रचून अटक केली.सलीम मतीन सय्यद उर्फ मोजेस (44 वय) अकबर अहमद सय्यद (45 वय) असे आरोपींचे नाव आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एक मोठा खुलासा केला. यातील सलीम सय्यद याने याआधी माटुंगा हद्दीत आणखी एक चोरी केल्याचे उघड झाले, तपास सुरु होता.
दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी मिळवलेला सोन्याचा मुद्देमाल खालीलप्रमाणे
1.7.640 ग्रॅम मंगळसूत्र, किंमत 55 हजार 351 रुपये
2.4.340 ग्रॅम मंगळसूत्र, किंमत 31 हजार 443 रुपये
एकूण हस्तगत ऐवज – 86 हजार 794 रुपये
या यशस्वी कारवाईमुळे पोलिस दलाचे कौतुक होत असून, झपाट्याने गुन्हे उघड करणाऱ्या पथकाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, गुन्हेगार कितीही हुशार असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…