मुंबई

Marathi Ekikaran Samiti : “मराठी माणसांच्या आंदोलनाला अडथळा, 6 ऑगस्टच्या घटनेवर कारवाई का नाही?”

Marathi Ekikaran Samiti Members Protesting At Dadar Kabutar Khana : गोवर्धन देशमुख ताब्यात; दादर कबुतरखान्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबई :- दादर कबुतरखान्याबाहेर आज मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. 6 ऑगस्टला जैन समाजाने चाकू-सुऱ्यांसह ताडपत्री फाडून आंदोलन केले, तरीही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असा सवाल समितीचे पदाधिकारी गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला. “त्या दिवशी पोलिस गप्प का होते? आणि आता मराठी माणूस शांततेने आंदोलन करत असताना त्याला का अडवले जाते?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. Marathi Ekikaran Samiti Members Protesting At Dadar Kabutar Khana

पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत, काल रात्रीच कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. मात्र सकाळी 11 वाजता देशमुख व अन्य कार्यकर्ते कबुतरखान्याबाहेर पोहोचले आणि पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी देशमुख यांना घेरून ताब्यात घेतले. “पोलिसांनी सहकार्य करावे, आणीबाणीचा काळ आणू नका,” अशी त्यांची मागणी होती.

या परिसरात सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुकानं बंद ठेवण्याचे आवाहन झाले होते. देशमुख यांना ताब्यात घेतल्यावर कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. पोलिसांनी 6 ऑगस्टला जैन समाजाला दिलेला ‘मोकळा मार्ग’ आणि आज मराठी आंदोलनाला लावलेली बंदी यावरून ‘दुहेरी निकष’ असल्याची टीका होत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago