Maratha Reservation: मराठा आंदोलन रमेश केरे पोलिसांच्या ताब्यात
Mumbai Maratha Reservation Protest Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याकरिता मोर्चा
मुंबई :- गिरगाव मध्ये मराठा आंदोलन रमेश केरे Ramesh Kere यांना ताब्यात घेतले आहे. मराठा आंदोलकांनी Maratha Reservation देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांची मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याकरिता काढला होता मोर्चा पोलिसांनी गिरगाव परिसरात मोर्चा रोखत रमेश केरे यांना ताब्यात घेतले आहे. Mumbai Maratha Reservation Protest Updates
काही दिवसांपासूनच राज्यात मराठा आरक्षणावर विविध आंदोलन सुरू आहे. एकीकडे जरांगे पाटील शासनाला मराठा आरक्षणासंदर्भात न्याय मिळवण्यासाठी उपोषण आणि मराठा समाजाला एकत्र आणून शासनाविरोधात भूमिका मांडत आहे. तर रमेश केरे हे मागील काही दिवसांपासून राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या घराबाहेर जाऊन मोर्चा काढून मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याकरिता नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आंदोलन रमेश केरे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगल्यावर धडक देणार होते तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना गिरगाव मध्येच रोखण्यात आली आहे. Mumbai Maratha Reservation Protest Updates
केरे म्हणाले की, आम्हाला मुंबई पोलिसांनी अडवले तर आम्ही ठिय्या मांडू. मराठा आरक्षणासाठी कुठेतरी राजकारण होत आहे. येणाऱ्या काळात मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागला नाही, तर योग्य उत्तर दिले जाईल. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली ती कशासाठी झाली, याबद्दलचा खुलासा करावा, असेही रमेश केरे पाटील म्हणाले यापूर्वी रमेश केरे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी केंद्राकडे मागणी करणारअसे आश्वासन मराठा आंदोलकांना दिले होते. Mumbai Maratha Reservation Protest Updates
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे म्हणाले की, शरद पवार यांनी मंडळ आयोग आणले. मात्र आता समाजासाठी हे नेते का एकत्र येत नाही. मराठा समाज हा आर्थिक दुर्बल असा आहे. त्यामुळे आम्हाला शैक्षणिक आणि इतर आरक्षण टिकणारे पाहिजे. मराठा आरक्षण प्रश्न सरकारने आणि इतर नेते मंडळींनी लवकरात लवकर मार्गी लावावा. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. बांगलादेशमध्ये काय झाले, हे बघत आहात. त्यामुळे आमचा उद्रेक बघू नका, असा इशाराही केरे यांनी दिला.