मुंबई

Mumbai Crime News : चेंबूरमध्ये बनावट संगणक साहित्य बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

•व्यवस्थापक आणि टेम्पो चालक अटकेत ; गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई

मुंबई :- नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट संगणक साहित्य तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा टिळकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चेंबूरमधील पी.एल. लोखंडे मार्गावरील एका गोदामावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 83 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गोदामाचा व्यवस्थापक आणि एका टेम्पो चालकाला अटक केली आहे.

चेंबूरच्या हनुमान चाळीतील एका गोदामातून मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांचे प्रिंटर आणि इतर बनावट साहित्य विकले जात असल्याची माहिती संबंधित कंपनीला मिळाली होती. त्यांनी तात्काळ टिळकनगर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून मंगळवारी सायंकाळी गोदामावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांचे प्रिंटर आणि इतर बनावट साहित्य मोठ्या प्रमाणात आढळले. जप्त केलेल्या साहित्याची किंमत 83 लाख रुपये आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गोदामात व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या नारायण वाव्हिया आणि टेम्पो चालक पप्पूकुमार पाल या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही अनेक दिवसांपासून हे बनावट साहित्य तयार करून त्याची विक्री करत होते. या कारवाईमुळे नामांकित कंपन्यांच्या नावाने चालणाऱ्या या गैरव्यवहाराला मोठा धक्का बसला आहे. पोलीस या रॅकेटमधील आणखी लोकांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0