
Vasai Anti Corruption Bureau Latest News : आरोपीला अटक न करण्यासाठी मागितली होती लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वसई :- मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशीगांव पोलीस ठाण्यात kashigaon Police Station कार्यरत असलेला एक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला आहे. एका आरोपीला अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. Vasai Police Staion Bribe News
या प्रकरणी तक्रारदाराने 15 ऑगस्ट रोजी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध काशीगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भगवान मोहन पालवे (वय 42) यांनी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. 15 आणि 18 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपी पोलीस उपनिरीक्षक पालवे यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, 18 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. सायंकाळीच्या पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांना काशीगांव पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्येच तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि संजय गोविलकर यांनी पार पाडली.


