Uncategorized

Maratha Aarakshan Challenged : मराठा समाजाच्या 10 टक्के आरक्षणाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

•ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता गेले सहा महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सातत्याने आमरण उपोषण करत होते त्यानंतर ते पायी मुंबईच्या दिशेने येऊ लागले या सर्व घडामोडीनंतर राज्य सरकारने राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून,ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी याचिका दाखल करत मराठा आरक्षणाचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. Maratha Aarakshan Challenged

मराठा समाज हा मागास नसून त्यांना कोणत्याही आरक्षणाची गरज नाही, असं जयश्री पाटील यांनी आपल्या याचिकेतून म्हटलं आहे. त्याचबरोबर निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेमणुकीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. Maratha Aarakshan Challenged

गुरुवारी (29 फेब्रुवारी) हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. आरक्षणविरोधी याचिका दाखल झाल्यास आमचं म्हणणं ऐकून घ्या, अशी विनंती विनोद पाटील यांनी हायकोर्टाला केली आहे. त्यामुळे आता लवकरच मराठा आरक्षणाचा लढा हायकोर्टात सुरू होणार आहे. Maratha Aarakshan Challenged

दुसरीकडे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठा समाजाचा ओबीस मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. Maratha Aarakshan Challenged

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0