पुणे

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभेला मैदानात उतरणार

Manoj Jarange Patil News : 8 जुनला सहा कोटी मराठा समाज एकत्र येणार म्हणून जरांगे पाटील यांची माहिती

पुणे :- मराठा समाजाला Maratha Reservation आरक्षण मिळावे याकरिता राज्यात रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये Lok Sabha Election मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली आहे तसेच आठ जूनला होणाऱ्या सभेला जवळपास सहा कोटी मराठा बांधव एकत्र येणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. Manoj Jarange Latest News

लय फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती? असे म्हणत रांगड्या भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून तिढा कायम असल्याने छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली. त्यानंतर रविवारी पुण्याच्या भोरमध्ये बोलतांना जरांगे यांनी निशाणा साधला आहे. Manoj Jarange Latest News

भुजबळ हिमालयात गेले का?

दरम्यान, यावेळी बोलतांना मनोज जरांगे यांच्या पायाजवळ अचानक सापसुरळी आली. त्यावरूनच जरांगे यांनी भुजबळांवर खोचक भाष्य केले आहे. ते म्हणाले, “लय फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला काय माहित?.. दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का काय हिमालयात”, असे जरांगे म्हणाले.

पुढे जरांगे म्हणाले, “मी तुमच्या ताकदीवर सर्व नीट केलेले आहेत. पूर्वी आपला समाज एकत्र येत नव्हता. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत कुणाला तुम्हाला ज्यांना पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही. एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी दाखवावी”, असे जरांगे मराठा बांधवांना संबोधित करताना म्हणाले.

“सगेसोयऱ्याची अंबलबजावणी आणि मराठा, कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करणे हे महत्वाचे आहे. या कायद्याच्या बाजूने जे नेते असतील त्यांनाच मतदान करावे. जर आरक्षण नाही दिलं, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज 100 टक्के मैदानात उतरणार”, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांनी 8 जूनला होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “1700 एकर जमीन आहे. त्यातील 900 एकर जमिनीची साफसफाई होत आहे. येत्या एक तारखेपासून त्याचे कामं अधिक वेगाने सुरू होणार आहे. नारायणगडाच्या पायथ्याशी शेकडो गावांची जवळपास 2 हजार हेक्टर जमीन आहे, पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकरी त्याचे बांधसुद्धा मोडणार आहेत. राज्यातील 6 कोटी मराठा समाज त्याठिकाणी येणार आहे. गावागावात त्याची जागृती लोकांनी सुरू केलेली आहे. एकही मराठा त्यादिवशी घरी राहणार नाही”, असे जरांगे म्हणाले. Manoj Jarange Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0