क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mantralay Job Scam : मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Mira Road Police Arrested Fraudster : मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून “निक्कीची” लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल, जोडप्याला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलीसांनी केली अटक

मीरा-भाईंदर :– मंत्रालयात नोकरी लावण्याचे Mantralaya Job Scam आमिष दाखवून भाईंदरच्या निक्की दीनानाथ भोईर या तरुणाची 4.20 लाखांना फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात Bhayandar Police Station गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोन आरोपींच्या विरोधात भादवि 420,406,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम येथे राहणाऱ्या नक्की देणार भोईर या तरुणीला लिपिक पदावर नोकरी लावतो त्यासाठी मंत्रालयात पैसे भरावे लागेल असे खोटे सांगू तरुणी कडून चार लाख वीस हजार रुपये अशी रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या सागर चंद्रकांत कासारे आणि त्यांची पत्नी या दांपत्यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सागर यांनी निक्की हिला मंत्रालय लिपिक पदावर नोकरीचे बनवत नियुक्तीपत्र ही देण्यात आले होते. Mira Road Latest Crime News

मंत्रालयातील नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बंटी बबली अटक

गुन्हयातील निष्पन्न पती-पत्नी आरोपी सागर चंद्रकांत कासारे हे गुन्हा दाखल झाले पासून ते त्यांचे राहते घर बदलुन दुसरीकडे राहण्यास गेले होते. तेव्हा पासून पोलीसांना मिळुन येत नव्हते. तसेच नमुद दाम्पत्य आरोपींतांच्या ठावठिकाणबाबत काहीएक उपयुक्त माहीती नसताना पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे पोलीस हवालदार संग्राम गायकवाड, पोलीस शिपाई साकेत माघाडे यांनी बाबत सखोल तपास केला असता त्यांना दाम्पत्य आरोपी हे साई सदन चाळ, रुम नं. 1, राजनपाडा, मालाड, मुंबई येथे राहत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्याबाबत अधिक तपास केला असता आरोपी सागर चंद्रकांत कासारे हा मालाड पुर्व, मुंबई येथे त्याचे राहते घराचे जवळ येणार असल्याची माहीती मिळाली असता त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच महीला आरोपी ही सिनेमॅक्स सिनेमागृह, मिरारोड पूर्व येथे येणार असल्याची माहीती मिळाली असता तिला देखील महिला पोलीस शिपाई चैताली सानप हीचे हस्ते शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाई करिता भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Mira Road Latest Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबूरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेद्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेंन्द्र विचारे, सहाय्यक फौजदार श्रीमंत जेथे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार संग्राम गायकवाड, हनुमंत सुर्यवंशी, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, सतिष जगताप, प्रविणराज पवार, महेश वेल्हे, अनिल नागरे, राजविर संधु, पोलीस शिपाई साकेत माघाडे, नितीन राठोड, अंगद मुळे, अकील सुतार, सहाय्यक फौजदार चैताली सानप, सचीन चौधरी, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. Mira Road Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0