महाराष्ट्र

manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षाची मागणी..

manoj jarange patil: छत्रपती संभाजी नगर मराठा समाज आक्रमक रास्ता रोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर :-मनोज जरांगे पाटील manoj jarange patil यांचे आंदोलन स्थळ असलेल्या अंतवाली सराटी गावावर ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताचे पडसाद विधान सभेत देखील उमटले होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी या प्रकरणी गंभीर दाखल घेण्याची मागणी केली होती. तसेच शासनाने मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी देखील केली होती. या वर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता या संदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी आता करण्यात आली आहे. या साठी मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीनगर मधील केंब्रिज चौक येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता राको आंदोलन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसदर्भातील मुद्दा आता तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maratha Community Demand To Provide Z Plus Security To Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ चौकात देखील आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. (Maratha Community Demand To Provide Z Plus Security To Manoj Jarange Patil)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0