Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; ‘गुप्त बैठकी’च्या दाव्यावरून छगन भुजबळ संतापले
मुंबई :- मराठा आरक्षणाचा जीआर (GR) निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेला आहे. जरांगे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भुजबळ यांच्यात गुप्त बैठक झाल्याचा दावा केल्यानंतर भुजबळ यांनी जरांगेंवर अभ्यास आणि शिक्षणावरून टीका केली. या टीकेला जरांगे यांनीही त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भुजबळांचा “अभ्यास किती, तो नेता नाही” हल्ला
पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना मनोज जरांगे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते अत्यंत आक्रमक झाले. भुजबळ म्हणाले, “काय ते जरांगे-जरांगे करता, त्याचा अभ्यास किती? त्याचं शिक्षण किती? आपण उगाच त्याला डोक्यावर घेतो. तो काही मराठ्यांचा लीडर नाही.”
मराठा समाजाचे खरे नेते यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार असल्याचे सांगत भुजबळ यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “तो त्या ठिकाणचे वाळू चोर, दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता आहे. तो महाराष्ट्राचा आणि मराठा समाजाचा नेता नाही.”
जरांगेंचा “तुझ्या अकलेची कुवत कळली” पलटवार
छगन भुजबळांच्या या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पलटवार करत भुजबळांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले.
जरांगे म्हणाले की, “तुला नेतेगिरीचे वेड लागले आहे. हुशार धनगर बांधवांना थांबवून ठेवले आहे. कुठल्याच ओबीसी जातीचा नेता तू होऊ देत नाही, त्याच खरं दुखणे नेता आहे. तू भेटला असशील तर भेटला असे मान्य कर. नागपूरमध्ये काँग्रेस मोर्चा काढणार आहे. हेच तुमच्या बैठकीत ठरले ना. तू फडणवीस, अजित पवार सगळ्यांच्या मागे लागला. त्यामुळं यातून डाव शिजतो आहे हे स्पष्ट दिसतंय.”
जरांगे पुढे म्हणाले, “माझा अभ्यास त्याला माहिती आहे आणि तुला अजून कळलं नसेल तर काय कामाचा? पवारांनी तुला खाऊ घातले, तिथं तू शिवसेनाप्रमुखांना जेलमध्ये टाकले. तू मला अज्ञानी म्हणतो. तुझ्या अकलेची कुवत मला कळली. तुला एक जीआरमध्ये पाळायला जागा उरली नाही. बरं मी अडाणी आहे. घेतो का माझी शाळा? मी स्वतःला नेता म्हणत नाही. मला आजही मराठा आंदोलक म्हणतात. नेत्यांची हवा तुला आहे. तुला कळत नाही.”
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…