Uncategorized

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस

Manoj Jarange Patil : संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची घेतली भेट, अहमदनगर आणि लातूर बंदची हाक

जालना :- मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मराठा समाजाला Maratha Samaj ओबीसीतून आरक्षण Maratha Reservation मिळावे या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून जरांगे पाटील पुन्हा एकदा अमरण उपोषणावर बसले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून जरांगे पाटील आपल्या मागणी करिता सातत्याने सरकारशी पाठपुरावा करत आहे तसेच वेळोवेळी त्यांनी सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलनाचाही मार्ग अवलंबला आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर जोर जरूर लागले आहे. जलांगे पाटील यांनी जर सरकारने भरड समाजाला आरक्षण करीत तात्काळ योग्य निर्णय घेतला नाही तर या सरकारला पाडल्याशिवाय राहणार नाही अशी शपथच जरांगे पाटील यांनी घेतली आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अद्यापही काही चर्चा झाली आहे हे समोर आले नाही. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता अहमदनगर आणि लातूर येथे बंद करण्यात आला आहे. Manoj Jarange Patil Latest News

संभाजीराजे छत्रपती जरांगे पाटील यांना भेटून आल्यानंतर काय म्हणाले?


मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार कसे आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला हवे आहे. हे आरक्षण कसे टिकणार यावर बोलायला हवे, असे ते संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, अठरापगड जातींसह बारा बलुतेदारांना न्याय दिला. त्यामुळे जे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात त्या सरकारने सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.

पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत सांभाळायला हवी. मनोज जरांगे यांच्या सोबत मी आधीसुद्धा होतो, आताही आहे आणि पुढेही असणार, असा विश्वास त्यांनी दिला आहे. पुढे सरकारवर निशाणा साधत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, इकडे या परिस्थिती काय आहे ते बघा. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. सगळ्या यंत्रणा आहेत तुमच्याकडे. इथे जर काही झाले तर सरकार जबाबदार असणार. त्याचसोबत विरोधकही तेवढेच जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. Manoj Jarange Patil Latest News

अहमदनगर आणि लातूर बंद

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज जिल्हा बंदची हाक दिली आहे. अहमदनगर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली आहेत. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन देखील सुरू केलं आहे. आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि बॉम्बे गव्हर्मेंट गॅजेट लागू करावं अशी मागणी आंदोलकांने केली जात आहेत.

लातूरमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलकांकडून बाजारपेठ बंदच आव्हान करण्यात येत आहे. तर या आव्हानाला व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसात दिला आहे. सकाळपासूनच बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. Manoj Jarange Patil Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0