Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातऱ्यात शांतता रॅली होती.व्यासपीठावरुन भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली बसले.
सातारा :- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांना शांतता रॅलीनंतर मराठा बांधवाना संबोधित करत असताना मनोज जरांगे यांनी चक्क आली आहे. जरांगे पाटील व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक खाली बसले. जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना उपचार घेण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जरांगे पाटील यांना व्यासपीठावरुन खाली नेण्यात आलं. मंचावर बोलत असतानाच त्यांना चक्कर आली. आता त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं. मंचावर त्यांचे हात थरथर होत होते.
मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या अनेक महिन्यांपासून रॅली आणि सभा घेत आहेत. त्यांच्या या सभेला आणि रॅलीला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. उपोषणानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मराठा आरक्षणासाठी दौरा सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी याआधीही म्हटलं होतं.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…