•Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis भुजबळांच्या नादाला लागून जर आरक्षण देणार नसाल तर तुमची सत्ता गमावून बसाल, इशारा जरांगे पाटील यांनी दिला
जालना :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही छगन भुजबळांच्या नादाला लागून मराठा समाजाला आरक्षण देत नसाल तर तुमची सत्ता गमावून बसाल. असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.सरकारच तुम्ही चालवता म्हणून तुम्हाला टार्गेट करत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारचा खुर्चीत जीव असून आता त्यांची सत्ताच ठेवणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून दोन उपमुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील केवळ मलाच टार्गेट करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील पलटवार केला आहे. इतकेच नाही तर राज्यात मराठा ठोक क्रांती मोर्चावर देखील टीका केली. हे सर्व आंदोलने प्रवीण दरेकर करत असल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाचे राज्यात कुठेही आंदोलन सुरू नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
सरकारकडून आता आमच्याशी कोणतीही चर्चा केली जात नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आरक्षण देणार नसेल तर आम्हाला त्यांचे उमेदवार पाडावेच लागतील. मात्र निवडून आणायचे की पाडायचे, याचा निर्णय 29 तारखेला होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. बारा महिन्यांपासून आम्ही लढा देत आहोत. तुम्ही आरक्षण देणार नसाल तर आम्हाला आमदारांना पाडावेच लागणार आहे. तुम्ही जर आरक्षण देणार नसेल तर आम्हाला हीच भाषा वापरावी लागेल, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…