महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शनिवारी म्हणजेच उद्यापासून पुन्हा एकदा उपोषणावर बसणार!

Manoj Jarange Patil Hunger STRIKE : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर, जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी दंड थोपटणार

जालना :- मराठा आरक्षणाच्या Maratha Arkshan मुद्द्यावरून महायुतीच्या सरकारला जरांगे पाटील Manoj Jarange Patil पुन्हा एकदा धारेवर धरणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील उद्यापासून म्हणजे शनिवारपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे एकीकडे बीड प्रकरण, परभणी प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा सरकार विरोधात दंड थोपणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जालन्याच्या आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण करणार आहे. त्यांनी आपल्या आंदोलनाची दिशा आणि दशा अजूनही स्पष्ट केले नाही परंतु पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर उठवली आहे.

मनोज जरांगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमचे आंदोलन मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. पण सरकार गोरगरीब मराठा समाजाचा का छळ का करत आहे हे आम्हाला समजले नाही. मी आमच्या मूळ मागणीसह इतर मागण्यांसाठी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजातील मागेल त्या व्यक्तीला कुणबी ओबीसी प्रमाणपत्र देणे, कुणबी नोंदी शोधणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, EWS आरक्षण पुन्हा लागू करणे या आमच्या मुख्य मागण्या आहेत. या मागण्या मान्य करून मराठा समाजाची मने जिंकण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी संधी आहे.ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होईल. त्यांनी मराठ्यांशी गद्दारी व बेईमानी करू नये हे माझे सांगणे आहे. त्यांनी समाजाशी गद्दारी व बेईमानी केली तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आमच्या मुलांवर त्यांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत. केवळ कमेंट केली म्हणून 9 महिने तुरुंगात डांबले. आमच्या महिलांचे डोके फोडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष आहे हे स्पष्ट आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आम्ही एक इंचही मागे हटणार नसल्याचेही यावेळी जोर देऊन स्पष्ट केले. संतोष देशमुख प्रकरणात आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. कुणाचाही बाप आला तरी आम्ही हे प्रकरण दाबू देणार नाही, असे ते म्हणालेत.

मनोज जरांगे यांनी यावेळी वाल्मीक कराडला रुग्णालयात दाखल करण्यावरही संशय व्यक्त केला. डॉक्टर या प्रकरणी कोणत्या तपासण्या करत आहेत. काय ऑपरेशन सुरू आहे का? पोलिस अधिकारी व डॉक्टरांमध्ये नेमके काय सुरू आहे? आरोग्य मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावे. या प्रकरणी एखाद्या डॉक्टरने चुकीचे पाऊल उचलले तर त्याचीही चौकशी केली जाईल. आता तो (वाल्मीक कराडध पळून जात नसतो, गेला तर पोलिस त्याचे पाय धरून आपटतील. ज्या पोलिसाची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे, त्याचा सर्व सीडीआर तपासला गेला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0