Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी जरांगे पाटील उपोषणावर ठाम
Manoj Jarange Patil hunger strike : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला इशारा, मराठा समाजाला शांत राहण्याचे केले आवाहन
जालना :- मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil आज 8 जूनपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation उपोषणाला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election आचारसंहितेमुळे 4 जून रोजीच्या उपोषणाच्या तारखेत बदल करत 8 जून रोजी केली होती. त्यानुसार आजपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांच्या आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून Jalna Police या उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत. मी उपोषण करणारच असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी सगेसोयरेची अधिसूचना करण्याची मागणी केली आहे. Manoj Jarange Patil Latest Update
मराठा समाजाला शांततेचे आवाहन
यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे, ते म्हणाले, “मराठा समाजाने शांत राहायचे आहे. सरकारकडून सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे. जातीय तेढ या शब्दांत आता द्वेष दिसायला लागला आहे. ग्रामस्थांकडून देण्यात आलेले निवेदन हे जाणीवपूर्वक होते. मात्र मला राजकारणात पडायचे नाही. मी आचारसंहितेचा सन्मान केला म्हणून 4 जूनच्या उपोषण 8 जूनपर्यंत पुढे ढकलले. आता विनाकारण समाजाला वेठीस करण्याचे कारण नाही”, असे जरांगे म्हणाले. Manoj Jarange Patil Latest Update
सरकारला इशारा
असून राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी आमची मागणी असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला. “जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. ते अंतवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते. Manoj Jarange Patil Latest Update
Web Title : Manoj Jarane : Maratha movement Manoj Jarange Patil starts fast to death from today, even though the police refused permission, Jarange Patil insists on the fast.