•मुख्यमंत्री फडणवीसही नाराजी व्यक्त, रोहित पवारांकडून अजित पवारांच्या ‘हिमती’चे कौतुक
मुंबई :- महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या विविध वाद आणि वक्तव्यांमुळे विरोधकांच्या टीकेचे केंद्रस्थान बनले आहेत. अशातच, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी सुरू असताना बाकावर बसून मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळत असल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत कठोर कारवाईबाबतचा सूचक इशारा दिला आहे.
अजित पवार यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले की, “कृषिमंत्री कोकाटे यांच्याबरोबर समोरासमोर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.” याचा अर्थ, या प्रकरणात काहीतरी ठोस कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकाटे यांच्या कृत्यावर आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे.
रोहित पवारांचा सवाल: ‘शिंदे हिंमत दाखवणार का?’
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) चे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे. यासोबतच रोहित पवारांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे: “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवारांसारखी हिंमत दाखवतील का?”
रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, “पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्त्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत एकनाथ शिंदे कधी दाखवणार? कृषीमंत्र्यांचा राजीनामा… भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या…”
रोहित पवारांच्या या ‘बॅगवाल्या मंत्र्या’च्या उल्लेखाला शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या एका व्हिडिओमुळे बळ मिळाले आहे. संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत,” असा दावा राऊत यांनी केला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मंत्री संजय शिरसाट एका खोलीतील बेडवर फोनवर बोलताना आणि सिगारेट ओढताना दिसत आहेत. त्यांच्या बेडशेजारी एक बॅग देखील दिसत होती, ज्यामध्ये नोटांची बंडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…