Manikrao Kokate Scam Update : सदनिका घोटाळा भोवला; अटक वॉरंटनंतर मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई, राज्यपालांकडून शिफारस मान्य
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि कायदेशीर पेचात अडकलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate अखेर मंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम राहिल्याने आणि न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचे खाते काढून घेण्याबाबत केलेली शिफारस राज्यपालांनी मान्य केली असून, रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी आता खुद्द अजित पवार सांभाळणार आहेत.
अटकेची टांगती तलवार आणि राजीनाम्याचे नाट्य बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याचा ठपका माणिकराव कोकाटे यांच्यावर ठेवण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या कायदेशीर कचाट्यामुळे अखेर त्यांना मंत्रिपदाचा त्याग करावा लागला. कोकाटे सध्या मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांची ‘फिल्डिंग’ आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय सुरुवातीला कोकाटे यांनी राजीनामा दिला नसल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यपालांकडे कोकाटे यांचे खाते काढून घेण्याची शिफारस केल्याने त्यांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी एकदा कोकाटे यांचे खाते बदलून त्यांचे मंत्रिपद वाचवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळी न्यायालयाच्या कडक भूमिकेमुळे आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे अजित पवार यांना ही कठोर कारवाई करावी लागली.
विरोधी पक्षाचा दबाव ठरला यशस्वी कोकाटे यांनी केवळ पदाचा कारभार सोडावा असे नाही, तर त्यांचा रीतसर राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवणे सरकारसाठी नैतिकदृष्ट्या अडचणीचे ठरत होते. अखेर कोकाटे पायउतार झाल्याने विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता हे रिक्त झालेले क्रीडा खाते पूर्णवेळ कोणाकडे जाणार की अजित पवार हेच ते सांभाळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…