मुंबई

Manikrao Kokate Hospitalized : माणिकराव कोकाटे आयसीयूमध्ये! थोड्याच वेळात होणार अँजिओग्राफी; लीलावती रुग्णालयात नाशिक पोलिसांचा पहारा

•सदनिका घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर प्रकृती खालावली; पोलिसांकडून अटकेच्या हालचाली सुरू

मुंबई | नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांचा रक्तदाब (Blood Pressure) अचानक वाढला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, त्यांचा उच्च रक्तदाब अद्याप अनियंत्रित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अँजिओग्राफीचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हृदयविकाराशी संबंधित काही समस्या उद्भवू नयेत यासाठी कोकाटे यांची आज सकाळी अँजिओग्राफी केली जाणार आहे. रुग्णालयात सध्या त्यांच्या पत्नी सीमा कोकाटे आणि मुलगी सीमंतिनी कोकाटे उपस्थित आहेत. अँजिओग्राफीच्या अहवालानंतरच त्यांना डिस्चार्ज कधी द्यायचा किंवा पुढील उपचार काय करायचे, यावर निर्णय घेतला जाईल.

रुग्णालयातच वॉरंट बजावण्याची शक्यता माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) म्हणजेच अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईतील लीलावती रुग्णालयात पोहोचले असून, कोकाटे यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोकाटे यांना डिस्चार्ज मिळताच किंवा त्यांची प्रकृती स्थिर होताच त्यांना रुग्णालयातच अटक वॉरंट बजावले जाण्याची शक्यता आहे.

विजय कोकाटे अद्याप फरार याच प्रकरणात माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांनाही दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र, विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही. नाशिक पोलिसांची विविध पथके त्यांचा शोध घेत आहेत.

राजकीय वर्तुळात खळबळ सदनिका घोटाळ्यासारख्या गंभीर प्रकरणात माजी मंत्र्याला दोषी ठरवण्यात आल्याने नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच कोकाटे रुग्णालयात दाखल झाल्याने, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago