मुंबईठाणे
Trending

Manikrao Kokate : कोकाटेंच्या राजकारणाला मोठा हादरा! – 29 वर्षे जुन्या गैरव्यवहार प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा कायम, क्रीडामंत्रीपद धोक्यात

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत; शासकीय कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप; आमदारकी आणि मंत्रिपद रद्द होण्याची शक्यता

मुंबई :- राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादग्रस्त ठरलेल्या एका जुन्या प्रकरणामुळे मोठ्या कायदेशीर पेचात सापडले आहेत. 29 वर्षांपूर्वीच्या एका शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात त्यांना ठोठावलेली दोन वर्षे तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आता जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

हे प्रकरण 1995 सालातील आहे. तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी ‘आर्थिक दुर्बल घटक’ असल्याचे खोटे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10 टक्के आरक्षित सदनिका मिळवण्यासाठी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंत्रिपदावर गंडांतर

यापूर्वी याच प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा सुनावली होती. कोकाटे यांनी या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवल्यामुळे कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही लोकप्रतिनिधीला झाल्यास त्याचे आमदारपद आणि पर्यायाने मंत्रिपद रद्द होऊ शकते.

वादग्रस्त कारकीर्द

कोकाटे हे यापूर्वीही सतत चर्चेत राहिले आहेत. ते कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेली विधाने आणि विधानमंडळात थेट ऑनलाईन ‘रमी’ गेम खेळताना दिसल्यामुळे महायुती सरकारवर मोठी नामुष्की ओढावली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करून त्यांच्याकडे क्रीडामंत्रिपद सोपवले होते. मात्र, आता हे क्रीडामंत्रिपदही धोक्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0