
Manikrao Kokate : कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडीनंतर कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; दत्तात्रय भरणेंना मदतीचे आश्वासन
मुंबई :- विधिमंडळात ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मौन सोडले आहे. कृषी खाते काढून क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय आपल्याला मान्य असून, नव्या खात्याबद्दल आपण खूप आनंदी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “जो निर्णय घेतला आहे, तो मला पूर्णपणे मान्य आहे.” नव्या खात्याबद्दल विचारले असता, त्यांनी हसतमुख चेहऱ्याने “I am very happy,” असे उत्तर दिले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे खातेबदलावरून त्यांच्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी त्यांनी नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविषयीही सकारात्मकता दाखवली. कोकाटे म्हणाले, “दत्तात्रय भरणेंना काही मदत लागल्यास मी नक्की करेन आणि त्यांनाही माझी मदत लागल्यास मी घेईन.” या विधानातून त्यांनी दोन्ही मंत्र्यांमध्ये सहकार्याची भावना असल्याचे संकेत दिले आहेत


