धाराशिव

कळंब मध्ये एमबीबीएस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

कळंब(प्रतिनिधी):
दि.१८/०८/२०२५ रोजी कळंब शहरातील श्री. राजेंद्र बिक्कड सर व मित्र परिवाराच्यावतीने कळंब शहर व परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील NEET 2025 मधून MBBS प्रवेशास पात्र झालेल्या व M.D.स. व आयुर्वेदीक M.स. साठी पात्र झालेल्या यशवंत भावी डॉक्टरांचा व क्रीडा क्षेत्रातील चमकत्या ताऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात कळंब शहरातील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, बुके, पुष्पहार व टेथेस्कोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
यावेळी एम.बी.बी.एस. ला प्रवेश झालेल्या श्रावणी श्रीधर रितापुरे, ओंकार प्रशांत काळे, समर्थ संजय भांगे, आदर्श औदुंबर रितापुरे, अजिंक्य अखिल कुलकर्णी, श्रावणी पांडुरंग टेळे.,सांचीप्रिया सुधीर वाघमारे
MS आयुर्वेदीक प्रवेशित विद्यार्थी शिवानी संतोष भांडे, M.D. S. प्रवेशित विद्यार्थी स्वप्निल रामहरी मुंडे,
विशेष गौरव सत्यजित चेतन कात्रे – (स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवल्याबद्दल) सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळंब व परिसरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर रमेश जाधवर, प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. महादेव महाराज आडसूळ, कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर,ad.तानाजी चौधरी, स्वप्नपूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठल माने, दैनिक लोकमतचे पत्रकार बालाजी बप्पा आडसूळ, राष्ट्रपती पारितोषिक विजेते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अरविंदजी फुलारी, प्राचार्य व राजकीय कट्टा चे संपादक सतीश मातणे, युवा सेनेचे प्रमुख सागर बाराते, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष चेतन कात्रे,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी बालरोग तज्ञ डॉक्टर रमेश जाधवर यांनी वैद्यकीय पेशा हा सामाजिक भान राखून करावा. समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे ब्रीद अंगी करावे असे आवाहन केले. प्रमुखातिथी ह भ प महादेव महाराज अडसूळ यांनी डॉक्टर हे देव आहेत, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी असा शुभ संदेश दिला. कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर यांनी नीट परीक्षेतून मिळवलेल्या यशाचे कौतुक केलं. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांनी विद्यार्थी व आई वडील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती पदक विजेते कवी लेखक श्री अरविंद फुलारी यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. या कार्यक्रमासाठी कळंब शहर व परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील बहुसंख्येने मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले तर सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक, शिवव्याख्याते महादेव खराटे व आभार पत्रकार प्रदीप यादव यांनी मानले, कळंब शहर व परिसरातील गुणवंतांच्या या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0