MangalPrabhat Lodha On Aslam Shaikh :सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना आमदार अस्लम शेख यांची ‘संपवण्याची’ धमकी; मुंबईच्या राजकारणात मोठा स्फोट!
मुंबई :- मुंबईच्या सुरक्षेसाठी रोहिंग्ये आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात सातत्याने मोहीम चालवणाऱ्या मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा Mangal Prabhat Lodha यांना मालाड-मालवणीचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी थेट ‘संपवण्याची’ धमकी दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
या गंभीर धमकीनंतर मंत्री लोढा यांनी तत्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी या धमकीवर तीव्र संताप व्यक्त करत आमदार शेख यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घुसखोरांविरोधातील कारवाई
राज्याचे कौशल्य विकास मंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी परिसरातील हजारो रोहिंग्ये आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात मोहीम उभारली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सध्या तिकडे अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 9 हजार चौरस मीटरचा सरकारी भूभाग अतिक्रमण मुक्त करण्यात आला असून कारवाई अजूनही सुरूच आहे.
‘मालवणी पॅटर्न’वरून वाद पेटला
आमदार अस्लम शेख हे रोहिंग्ये आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीला प्राधान्य देऊन ‘मालवणी पॅटर्न’ राबवत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केला आहे. साटम यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, “चौक सभा घेऊन त्यांनी दिलेल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. उलट त्यांचा मालवणी पॅटर्न आम्ही मुळापासून उपटून टाकणार आहोत.” त्यांनी पोलीस आयुक्तांनी लोढा यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आमदार लोढा यांनी स्पष्ट केले आहे की, अस्लम शेख सारख्या विघटनवादी शक्तींनी कितीही धमक्या दिल्या तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कसलीही तमा न बाळगता रोहिंग्ये आणि घुसखोर बांग्लादेशींच्या विरोधात कठोर कारवाईचा पाठपुरावा करत राहणार.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…