Mandul snake smuggling in Mumbai : मुंबईत मांडूळ सापाची तस्करी, चौघांना अटक
Mandul snake smuggling in Mumbai : आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या मुंबईत चौघांना कप परेड पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.
मुंबई :- आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या Mandul snake smuggling सापांची तस्करी करणाऱ्या चौघांना कप परेड पोलिसांनी अटक केली आहे.नरसिंहा सत्यमा धोटी, (40 वय रा.नालगोंडा, तेलंगणा) शिवा मल्लेश आडप,(18 वय, रा. यादरी, तेलंगणा) रवी वसंत भोईर, (54 वय, रा. मुलुंड, मुंबई.) अरविंद चौतुराम गुप्ता,( 26 वय, रा. मुंब्रा, ठाणे) पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. आंतरराज्यीय टोळी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मेकर टॉवर जवळ पोलिसांनी Mumbai Police सापळा रचून या टोळीला अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडील मांडूळ जातीच्या सापाची किंमत साधारण कोट्यावधीच्या घरात असल्याचे सांगितले जाते. Mumbai Police Latest News
कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मेकर टॉवर जवळ काही व्यक्ती हे एक जिवंत मांडूळ प्रजातीचा दूर्मिळ सर्पाची (वन्यजीव) अवैधरित्या तस्करी करून विक्री करण्याकरीता येणार असल्याची गोपनीय माहिती कफ परेड पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देवकर व पोलीस उपनिरीक्षक रुपेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने पोलीस पथकाने मेकर टॉवर परिसरात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार एका पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कार मधून चार तस्कर तेथे आले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून तसेच गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या इशाऱ्यावरून पोलीसांनी एर्टिगा गाडीची तपासणी केली असता गाडीच्या पाठीमागील बाजूला ठेवलेल्या एका बॅगची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यात एक साधारण 5 किलो वजनाचा व 55 इंच लांबीचा मांडूळ साप आढळून आला. मांडुळ सर्पास Aarey Key Foundation चे सर्पमित्र गणेश गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास सुरक्षिततेसाठी वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Mumbai Police Latest News
पोलीस हवालदार प्रशांत सावंत यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात कफ परेड पोलीस ठाणे येथे कलम 39(3), 44, 48 (ए), 51 वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक केली आहे. Mumbai Police Latest News
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-1) प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त (कुलाबा विभाग),शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप विश्वासराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कफ परेड पोलीस ठाणे यांच्या पर्यवेक्षणात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देवकर, अभिजीत भोसले, पोलीस उपनिरीक्षक रूपेशकुमार भागवत, पोलीस हवालदार प्रशांत सावंत, प्रतोद नाईक, पोलीस शिपाई प्रविण यादव, मुरली चौधरी, प्रकाश बारी यांनी पार पाडली.