Nilesh Rane On Ravindra Chavan : निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर थेट ‘पैसे वाटपा’चा आरोप; नितेश राणेंकडून ‘धिंगाणा’ न घालण्याचा इशारा, भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड
मालवण :- शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल (26 नोव्हेंबर) मालवणमधील भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरावर थेट धाड टाकून कोकणच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम हिरव्या रंगाच्या पिशवीत एका खोलीत ठेवलेली होती, अशी माहिती राणेंनी दिली.
रवींद्र चव्हाणांवर थेट आरोप
या घटनेनंतर निलेश राणे यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. चव्हाण मालवणमध्ये येऊन गेल्यापासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. “पैसे वाटप करून निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा,” असे आव्हान देत राणे यांनी काही भाजप कार्यकर्त्यांची नावे घेतली. पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत हे कार्यकर्ते अंगावर पैसे घेऊन वाटत असल्याचा आणि त्यांच्याकडे रोज बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नितेश राणेंकडून ‘धिंगाणा’ न घालण्याचा इशारा
या संपूर्ण प्रकरणावर आता भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणे यांच्यावरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. यामुळे दोन्ही राणे बंधूंमधील राजकीय वाद आता टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे.
नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर?” तसेच, “आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार. हमाम मैं सब नंगे है,” असे म्हणत नितेश राणे यांनी निलेश राणेंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
युती आणि पगारावर वाद
युती न करण्याच्या भूमिकेवरून निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाणांवर टीका केली. तसेच भाजपचे पदाधिकारी त्यांच्या पगारावर असल्याचा दावाही केला. यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले की, युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेलेली आहे. राजकीय निर्णयांना राजकीय चष्म्यातून पाहावे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…