क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Airport News : 51 कोटींचं कोकेन पकडलं! विमानतळावर विदेशी नागरिकास अटक

Mumbai Airport News : कमरेच्या पट्ट्यात आणि पायातील सपोर्टर्समध्ये लपवलेली होती पाच किलो कोकेनची भुकटी

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाने (एआययू) केलेल्या धडक कारवाईत 5 किलो 194 ग्रॅम कोकेनसह एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. Mumbai Airport News आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत तब्बल 51 कोटी 94 लाख रुपये असून, या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सीमाशुल्क विभागाच्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय टोळीचं जाळं उघड; चौकशीत महत्त्वाचे तपशील उघड

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित परदेशी प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्याची सखोल झडती घेतली. त्यावेळी त्याने कमरेला बांधलेला ऑर्थो वेस्ट बेल्ट आणि पायात घातलेले काल्फ सपोर्टर्स यामध्ये पांढऱ्या रंगाची भुकटी आढळली. तत्काळ जागीच तपासणी किटच्या सहाय्याने तपासले असता ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत तो एका जागतिक ड्रग्ज सिंडिकेटसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या प्रवासाचा, निवासाचा खर्च आणि कामासाठी दिल्या जाणाऱ्या मोबदल्याची माहितीही पुढे आली असून, या प्रकरणी मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासाचा मोठा फड उघडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0