Malegaon Latest News : महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांच्या उपस्थितीत मंजूर झाले होते प्रस्ताव; काँग्रेसने पुराव्यासह भाजपला घेरले
मुंबई | मालेगावच्या वादावरून सुरू झालेले ‘टिपू सुलतान’ राजकारण आता मुंबई महापालिकेच्या Mumbai BMC जुन्या कागदपत्रांमुळे नव्या वळणावर आले आहे. काँग्रेसने भाजपवर ‘ध्रुवीकरणाचा अजेंडा’ राबवल्याचा आरोप करत, मुंबईतील दोन रस्त्यांना टिपू सुलतानचे Tipu sultan नाव देण्याचे प्रस्ताव भाजपनेच मंजूर केल्याचा दावा केला आहे. यामध्ये भाजपच्या विद्यमान महापौरांपासून ते शहराध्यक्षांपर्यंत अनेकांचा सहभाग असल्याचे पुरावे काँग्रेसने दिले आहेत. Maharashtra Political Latest News
काय आहेत काँग्रेसने दिलेले पुरावे?
मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाजमाध्यमांवर काही जुने ठराव प्रसिद्ध केले आहेत:
प्रस्ताव 1 (गोवंडी): 2013 मध्ये गोवंडी येथील एका मार्गाला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी विद्यमान महापौर रितू तावडे या प्रभाग समितीत उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, महासभेत या प्रस्तावाला आताचे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अनुमोदन दिले होते.
प्रस्ताव 2 (अंधेरी): 2001 मध्ये अंधेरी पश्चिम येथील एका रस्त्याला ‘शेर ए म्हैसूर टिपू सुलतान मार्ग’ देण्याच्या प्रस्तावात भाजपचे माजी नगरसेवक विठ्ठल खरटमोल हे सूचक होते.
वाद आणि हिंसक वळण
हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. पुण्यात काँग्रेस भवनसमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही गटात झटापट आणि दगडफेक झाल्याने या वादाला हिंसक वळण लागले. मात्र, आता काँग्रेसने भाजपच्याच जुन्या भूमिकेचा पर्दाफाश केल्याने “तेव्हा टिपू सुलतान प्रिय होता आणि आज का वाईट झाला?” असा सवाल विचारला जात आहे.
सचिन सावंत यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले की, “हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी आणि समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजप आज टिपू सुलतानला विरोध करत आहे.” दुसरीकडे, भाजपने या जुन्या प्रस्तावांवर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…