Malegaon blast case : मालेगाव स्फोट आरोपी निर्दोष: जलील यांचा ‘न्याय’व्यवस्थेवर संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘सुमोटो’ हस्तक्षेपाची मागणी!

Malegaon blast case Sadhvi pradnya: मालेगाव स्फोट: निर्दोष सुटकेवर वादंग! जलील संतापले, सर्वोच्च न्यायालयाची दार ठोठावणार?
छत्रपती संभाजी नगर :- मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व 7 आरोपींची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष सुटका केली. या निर्णयावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महायुती सरकारला या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं आवाहन केलं आहे. जर राज्य सरकारने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेलं नाही, तर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची ‘सुमोटो’ दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. Malegaon blast case Sadhvi pradnya
29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.38 वाजता मालेगावच्या भिकू चौकालगत एका दुचाकीवर झालेल्या स्फोटात 6 जण ठार, तर 90 हून अधिक जण जखमी झाले होते. गुरुवारी एनआयए कोर्टाने या खटल्याचा निकाल दिला, ज्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी व सुधाकर धर द्विवेदी या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका झाली.
या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त करताना इम्तियाज जलील म्हणाले की, “जेव्हा ही घटना घडली, तेव्हा विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण सत्तेत होते. मग हे आरोपी निर्दोष असतील, तर या नेत्यांनी बॉम्बस्फोट होऊ द्या आणि त्यानंतर आम्ही कोणत्याही रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याला आरोपी करू, असं सांगितलं होतं का?” हा एक गंभीर विषय असून, त्यावर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.
जलील यांनी सरकारला आठवण करून दिली की, रेल्वे बॉम्बस्फोटाच्या निकालाला ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं, त्याच प्रकारे मालेगाव प्रकरणालाही आव्हान दिलं पाहिजे. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्याला आव्हान देण्याची मागणी केली होती. “आता मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातही न्याय हवा असेल, तर जात, धर्म आणि राजकारण न पाहता तत्काळ या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं पाहिजे,” असं आवाहन जलील यांनी केलं.



