Malad Call Center Fire News : ‘फोर डायमेंशन’ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मध्यरात्री दुर्घटना; 15 हजार चौ. फूट क्षेत्रातील साहित्य जळून खाक
मुंबई :- मुंबई शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, मालाड (पश्चिम) येथील लिंक रोडवरील ‘फोर डायमेंशन’ या व्यावसायिक इमारतीत गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका कॉल सेंटर युनिटमध्ये ही आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Malad Latest Fire News
नेमकी घटना काय?
गुरुवारी मध्यरात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास ‘फोर डायमेंशन’ इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. आग क्षणातच वाढत गेल्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने या आगीला ‘दोन क्रमांकाची’ वर्दी दिली. पाचव्या मजल्यावर असलेल्या सुमारे 15 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या कॉल सेंटर युनिटमधील विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, लाकडी फर्निचर, पार्टिशन, फॉल्स सीलिंग, संगणक (कम्प्युटर्स) आणि सर्व्हर रूममधील साहित्य या आगीत जळून खाक झाले.
नियंत्रणात अडथळे
आग लागल्यामुळे संपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात सुरुवातीला अडथळे येत होते. अखेर, जवानांनी इमारतीच्या काचेची तावदाने फोडली, ज्यामुळे धूर बाहेर पडला आणि अग्निशमन दलाला काम करणे सोपे झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात अग्निशामक गाड्या, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणून पूर्णतः विझवण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजता आग पूर्णपणे विझली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…