मुंबई

Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये मोठी अंमली पदार्थ कारवाई! गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत 37 लाखांचा गांजा जप्त

•तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या, घराच्या पडवीतून सापडला 74 किलो गांजा

भिवंडी :- भिवंडी शहरातील मोमीनबाग परिसरात गांजाची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडी यांनी मोठी कारवाई करत तब्बल 37 लाख 37 हजार 400 रुपये किमतीचा 74 किलो 548 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,3 जुलै 2025 रोजी करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अन्वर अन्सारी याच्या घराजवळ फैजल अन्सारी हा अब्दुल रहमान अन्सारी याला गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि फैजल अकबर अन्सारी (44 वय), अब्दुल रहमान अन्सारी (20 वय ) आणि अन्वर जमीलुद्दीन अन्सारी (34 वय) यांना अटक केली.

छापेमारीदरम्यान, फैजल आणि अब्दुल रहमान यांच्या अंगझडतीत आणि अन्वरच्या घराच्या पडवीतून मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा आढळून आला. संबंधित तिघांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव, व सहाय्यक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकातील अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago