Mahendra Sheth Gharat : अटल सेतू (MTHL) वरील कामगारांनी स्वीकारले महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व!
पनवेल : कोकणचा कायापालट करणारा MMRDA चा महत्वाकांक्षी प्रकल्प, अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू (MTHL)वर सर्वात मोठा टोलनाका शेलघर tollnaka shelghar येथे सुरु करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पात सुमारे दोनशे ते अडीचशे विविध विभागात कामगार काम करत आहेत. हा टोलनाका लवकरच खाजगी कंपनीला चालवायला देण्यात येणार आहे. कामगारांनी आपली नोकरी व पगार साबूत राहावा यासाठी कामगारांचे खंबीर नेतृत्व असलेले कामगार नेते महेंद्रशेठ घरत Mahendra Sheth Gharat यांच्या न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे.
संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते बुधवारी करण्यात आला. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन घरत, उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, इंटकचे रायगड जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील, संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, जासई ग्रा. प. सदस्य आदित्य घरत , संघटक अभिजित घरत, आनंद ठाकूर, अरुण म्हात्रे, तसेच शेकडो कामगार उपस्थित होते. Panvel Latest News