महाराष्ट्र
Trending

Maharashtra Winter Update : राज्यात ‘हुडहुडी’ वाढली! – तापमानाचा पारा 5.4°C पर्यंत घसरला, थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार

Maharashtra Winter Update : धुळे सर्वात थंड; पूर्व विदर्भाला यलो अलर्ट, मुंबई-पुण्यातही गारवा; अचानक थंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

मुंबई/पुणे :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी कमी झाली होती, मात्र डिसेंबर महिना जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा वातावरणातील गारवा वाढू लागला आहे. राज्यात तापमानाचा पारा खाली सरकला असून आता पुणेकरांना स्वेटर्स तर मुंबईकरांनाही सकाळी बऱ्यापैकी गारवा जाणवणार आहे. Maharashtra Winter Update

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर

धुळे धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरून 5.4 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. थंडीमुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून, गहू आणि हरभरा पिकांना मात्र याचा मोठा फायदा होत आहे.

नाशिक (निफाड): नाशिकमधील निफाड येथे गहू संशोधन केंद्रात 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे पारा 11अंशांवरून खाली घसरला आहे.

गोंदिया: गोंदियात पारा 8.2 अंशांवर पोहोचला असून, हे यंदाचे सर्वात कमी तापमान आहे. रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.

पूर्व विदर्भ: पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवत असल्याने हवामान विभागाने या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण आणि मुंबईची स्थिती

मुंबई-पुणे: या दोन्ही शहरांमध्ये गारव्याचं वातावरण जाणवायला लागलं आहे.

पालघर: पालघरमध्ये सकाळचे तापमान 16–17°C नोंदवले जाईल.

कोकण: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सकाळी 17–19°C पर्यंत थंडी जाणवेल, तर दुपारी तापमान 30–32°C राहील. कोकणात हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे.

द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली

थंडीत अचानक वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या फुगवणीच्या स्टेजला असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.

दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 11 डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0