Emiway Bantai : एमिवे बंटाईला 1 कोटीची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी!

Emiway Bantai News : सिद्धू मूसेवालाला अर्पण केलेल्या गाण्याच्या आदल्या दिवशी एमिवे बंटाईला धमकी,कनडातील ‘गोल्डी बरार’चा दावा, अमेरिकास्थित गुन्हेगारी जाळ्याचाही उल्लेख
नवी मुंबई :- भारतीय रॅप विश्वातील एक तेजस्वी नाव… एमिवे बंटाई! पण ‘ट्रिब्यूट टू सिद्धू मूसेवाला’सारखं हृदयस्पर्शी गाणं रिलीज करताना त्याच्या आयुष्यावरच संकट कोसळलं! गाण्याच्या आदल्या रात्रीच त्याला धमकीचा मेसेज आला — “24 तासात 1 कोटी द्या, नाहीतर जीव जाईल!”
ही धमकी बंटाई रेकॉर्ड्सच्या नावाने नोंदवलेल्या अधिकृत मोबाइल नंबरवरून आली. संदेश पाठवणाऱ्याने स्वतःला कनडास्थित कुख्यात गँगस्टर गोल्डी बरार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, अमेरिकास्थित रोहित गोदारा या गुन्हेगाराचाही उल्लेख करत, एमिवेच्या जीवनावर संकट निर्माण केले.
या प्रकारानंतर नेरुळमधील रहिवासी एमिवेने एनआरआय कोस्टल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून क्राईम ब्रँचची टीमही तपासात उतरली आहे.
मूसेवाला हत्या प्रकरणाशी धागेदोरे?
29 मे 2022 ला मानसा, पंजाब येथे सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली होती. या हत्येचा मास्टरमाइंड म्हणून लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले होते. गोल्डी बरारनेही हत्या स्वीकारल्याचा दावा केला होता.
आता, सिद्धूच्या स्मृतीत गाणं तयार करणाऱ्या एमिवेवरच जीवघेणा डाव? कोण रचतंय ही कटकारस्थानं? आणि का?
पोलिस तपास यावर प्रकाश टाकतो का, याकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचं लक्ष लागलं आहे.


