मुंबई

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला ‘थंडीच्या मोठ्या लाटेचा’ इशारा! – विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात तापमान 10°C खाली

Maharashtra Weather Update : उत्तर भारतातून थंडगार वाऱ्यांचा प्रवाह वाढला; यवतमाळमध्ये 8.8°C तर गोंदियात 9°C किमान तापमान; पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहणार

पुणे/मुंबई :- राज्यासह देशातील वातावरणात मोठा बदल झाला असून, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा सातत्याने खाली घसरत आहे. Maharashtra Weather Update

थंडीची लाट आणि IMD चा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात थंडीच्या मोठ्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेषतः पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा प्रभाव जाणवेल.

उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे.पुढील तीन दिवस किमान तापमानात घट होण्याचा अंदाज असून, तापमान 15 अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते.

IMD ने 8,9,10 आणि 11 डिसेंबर रोजी विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशासह अनेक राज्यांमध्ये तीव्र थंडी पडण्याचा इशारा जारी केला आहे.

सर्वाधिक कमी तापमान:

सोमवारी (8 डिसेंबर) राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान 10°C च्या खाली नोंदवले गेले.

यवतमाळ 8.8°C (राज्यात सर्वात कमी)
गोंदिया 9.0°C
मालेगाव 9.0°C
अहिल्यानगर 9.5°C
अमरावती 9.6°C
नांदेड 9.9°C

मुंबईतील स्थिती

मुंबईमध्येही गारठा वाढला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी 22.2°C, तर सांताक्रूझ केंद्रात 18.4°C किमान तापमानाची नोंद झाली.

या जिल्ह्यांना ‘थंडीच्या लाटेचा’ मोठा इशारा

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (आणि नाशिक घाट परिसर), अहिल्यानगर, पुणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला आहे.

vivek

Recent Posts