मुंबई

Maharashtra Weather News : राज्यात थंडीचा जोर वाढला! – पुणे, जळगाव महाबळेश्वरपेक्षाही गारठले, ‘मिनी काश्मीर’चा फील आता साताऱ्यात

Maharashtra Winter Weather Update :,पुण्यात 7, तर जळगावात 6.5 अंश सेल्सिअस तापमान; नागरिक स्वेटर आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी (Maharashtra Weather Update) जाणवत आहे. या थंडीच्या लाटेत प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वरपेक्षाही पुणे आणि सातारा गारठले असल्याचे दिसून येत आहे. Maharashtra Winter Weather Update

पुणे आणि सातारा गारठले

पुण्यातील किमान तापमान थेट 7 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तापमान दिवसेंदिवस घटत असल्याने पुणेकर सध्या ‘गुलाबी थंडी’चा अनुभव घेत आहेत.

सातारा महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी साताऱ्यात पडली आहे. महाबळेश्वरचे तापमान 10 अंश सेल्सिअस आहे, तर साताऱ्यात तापमान 9 अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे साताऱ्यातच मिनी काश्मीर असल्याचा अनुभव येत आहे.
थंडी वाढल्यामुळे साताऱ्यासह ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे.

जळगाव सर्वात थंड

कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याने आज थंडीत मोठी घट नोंदवली. जळगावचे तापमान 6.5 अंश सेल्सिअसवर आले असून, अनेक नागरिक गरम कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.

कोकणातही थंडीची लाट

केवळ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर कोकणातही थंडीचा कडाका वाढला आहे. सलग चौथ्या दिवशी दापोलीचा तापमानाचा पारा घसरला असून, दापोलीकरांना हुडहुडी भरली आहे. दापोलीत तापमान 6.5 अंश सेल्सिअसवर आले आहे. खेड, चिपळूण आणि गुहागरमध्ये देखील थंडीची लाट पसरली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago