Maharashtra Vidhan Sabha Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात “गद्दार गद्दार” घोषणा देणारा काँग्रेसचा पदाधिकारी ठाकरे गटात
Chandivali Vidhan Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाब विचारण्यासाठी थेट काँग्रेस कार्यालयात
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचा ताफा मुंबईतून जात असताना काँग्रेस कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दार गद्दार अशी घोषणा दिली होती. संतप्त मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस प्रचार कार्यालयामध्ये प्रवेश करून जाब विचारण्यासाठी गेले होते.
चांदिवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नसीम खान हे उमेदवार आहेत. त्यांच्या कार्यालयासमोरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. तसेच गद्दार असे म्हणत घोषणा देण्यात आल्या. याच वेळी संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. हे ऐकताच मुख्यमंत्र्यांचा पारा चढला असल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी चिडले आणि थेट गाडीतून उतरले आणि समोर असलेल्या नसीम खान यांच्या कार्यालयात चालत गेले. तेथील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना “ऐसा सिखाते क्या आप लोग?”, अशा कडक शब्दात शिंदेंनी खडसावले. यानंतर पोलिसांनी संतोष कटके आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश!
संतोष कटके याचे वडील साधू कटके हे आरपीआय (आठवले गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष कटकेने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्याने ते चर्चेत आले आहेत. संतोष कटके यांनी सकाळीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट देखील त्याने घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारले की काल शाखेत कोण होते? तेव्हा कार्यकर्त्यांनी संतोष कटके याला पुढे केले आणि सांगितले की हाच होता ज्याने गद्दार म्हणले. यावर उद्धव ठाकरे यांनी शाब्बास !! हा फोटो मुद्दाम द्या, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया दिली.