Maharashtra Vidhan Sabha Election : मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त, मुंबईत 30 हजार पोलिस तैनात
Maharashtra Vidhan Sabha Election : मुंबईतील वाहतूक नियंत्रणासाठी शहरात 144 पोलीस अधिकारी आणि एक हजार पोलीस हवालदार तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय चार हजारांहून अधिक होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मतदान केंद्रापासून पुढे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी राजधानी मुंबईत 30 हजार पोलिस Mumbai Police तैनात करण्यात येणार आहेत.
मुंबईत मतदानाच्या दिवशी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे 5 अधिकारी, 20 पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि 83 सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) हे 25 हजारांहून अधिक पोलीस कॉन्स्टेबल, विविध पथकांचे नेतृत्व करणार आहेत. दंगल नियंत्रण पोलिसांची 3 पथके सज्ज असतील.
याशिवाय वाहतूक नियंत्रणासाठी शहरात 144 पोलीस अधिकारी आणि एक हजार पोलीस हवालदार तैनात करण्यात येणार आहेत. 4 हजारहून अधिक होमगार्डही तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
26 केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/राज्य सशस्त्र पोलीस दल (CAPF/SAP) च्या तुकड्या ज्यात स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST), FST तैनात केली जाईल. या निवडणुकीत मुंबईत 175 कोटी रुपयांची रोकड, मौल्यवान वस्तू, दारू आणि ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रात एकाच टप्प्यात या निवडणुका घेत आहे. या निवडणुकीचा निकाल शनिवारी (23 नोव्हेंबर)