मुंबईठाणे
Trending

Gopichand Padalkar : “हिंदू महिला-मुलींनी जिममध्ये जाऊ नये”; आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद

Gopichand Padalkar On Love Jihad : बीडमधील सभेत पडळकरांचे आवाहन; ‘ट्रेनर कोण आहे पाहा, घरातच योगा करा’

बीड :- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. बीड जिल्ह्यामध्ये आयोजित एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हिंदू महिला आणि मुलींनी जिममध्ये जाऊ नये, असे थेट आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पडळकर नेमकं काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे रॅकेट चालवण्याचा आरोप पडळकर यांनी यापूर्वी केला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सभेत पडळकर यांनी तरुण मुली आणि महिलांना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला.

पडळकर म्हणाले, “जिममध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा? आपल्या तरुण मुली जिममध्ये जात असतील, तर त्यांना सांगा घरातच योगा करा. तिकडे जाण्याची गरज नाही. ते तुम्हाला फसवत आहेत, तुमच्यावर अन्याय करत आहेत.”

‘जिहादी प्रवृत्ती’वर कडक भूमिका घेण्याची मागणी

पडळकर यांनी महाविद्यालयीन परिसरातही कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. “ज्या शहरात महाविद्यालये आहेत, त्या महाविद्यालयात विद्यार्थी सोडून दुसऱ्या कोणत्याही पुरुष किंवा मुलास प्रवेश देता कामा नये. महाविद्यालय परिसरात जिहादी प्रवृत्तीची मुले दिसली, तर पोलिसांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

बीडमधील वाढत्या प्रकरणांवर चिंता

बीड जिल्ह्यात ‘जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची प्रकरणे’ वाढल्याचा आरोपही पडळकर यांनी केला. यामध्ये दुसऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणे, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे, झोपडपट्टी आणि अवैध व्यवसाय उभे करणे, तसेच देशी गाईंची कत्तल करणे, हे प्रकार सुरू आहेत. या प्रकारांना कोणी रोखायला गेले तर त्यांना मारहाण करून उलट त्यांचीच तक्रार केली जाते, असे पडळकर म्हणाले.

एका कोट्यधीश व्यापाऱ्याच्या मुलीला फूस लावून लग्न लावण्यासारखी प्रकरणे घडल्याचा उल्लेख करत, या प्रकरणांबाबत लोकांमध्ये जागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री अशा प्रकारांच्या विरोधात असून, ‘सर्वधर्म समभावाच्या नावाखाली हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत’, असेही आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0