मुंबई
Trending

Maharashtra Vidhan Sabha Election भारतीय जनता पक्षाचा मुंबईत या विधानसभा क्षेत्रात मनसेला जाहीर पाठिंबा!

Ashish Shelar On Shivdi Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना जाहीर पाठिंबा

मुंबई :- लोकसभेच्या निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election दरम्यान राज ठाकरे Raj Thackeray यांनी महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर पाठिंबा दिला होता. लोकसभेला राज ठाकरे यांनी कोणतेही उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात उतरले नसून राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांकरिता खास करून भाजपाकरिता जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची परतफेड म्हणूनच आशिष शेलार Ashish Shelar यांनी मनसेच्या बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, मनसेला आमचा पाठिंबा हा महाराष्ट्रात नाही तर केवळ शिवडी मतदारसंघापुरता मर्यादित आहे. मी आता फक्त शिवडीपुरता बोलत आहे. ते राज्यभर घेऊन जाऊ नका. मी माहीमबद्दल बोललो आणि महाराष्ट्रभर घेऊन गेले. आता भूमिका केवळ शिवडीपुरता मर्यादित असेल. एक तर अजय चौधरी नाहीतर, बाळा नांदगावकर आणखी काही पर्याय तर नाहीत. नोटा आपला विषय नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे.

आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

आशिष शेलार म्हणाले की, कोरोना काळात गणेश भक्त सांगत होते की गर्दी नको, ऑनलाइन दर्शन घेऊ, आम्हाला उत्सव साजरा करु द्या. पण सुधीर साळवींनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चाटूगिरी केली. गणेश भक्तांना काय वाटेल, याचा विचार न करता उद्धव ठाकरेंच्या हुकुमाखातर लालबागच्या राजाची 100 वर्षांची परंपरा खंडित केली. त्यामुळे सुधीर साळवी त्याचे परिणाम भोगत आहेत.

आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेसने सावरकरांचा वारंवार केलेला अपमान उद्धवजी त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत.. सावरकरांच्या बदनामीला मूक पाठिंबा दिला. ‘पीएफआय’वर बंदी आणली, त्यावर समर्थ करणारी भूमिका मांडली नाही. पालघर साधू हत्याकांड झाले, पण ना खेद ना दुःख, ना चौकशीला तयार. सीएए ला विरोध केला, काश्मीर मध्ये 370 हटवले त्याला विरोध. हिंदू समाज सडलेला आहे, असे शरजील उस्मानी म्हणतो यांना महाराष्ट्रात ठाकरे सरकार निर्दोश सोडते. मग आम्ही त्यांचे कसे समर्थन करणार का? असा सवाल करत त्यांनी मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0