मुंबई
Trending

Maharashtra Vidhan Sabha Election : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 पदाधिकाऱ्यांवर कारवाई !

AJit Pawar Take A Action 8 Member Of NCP : पक्षविरोधी कारवाई केल्याने 8 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं.

मुंबई :- महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण 8 पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे Sunil Tatkare यांनी पत्रद्वारे 8 पदाधिकाऱ्यांचे निलंबन केल्याचे जाहीर केले आहे. महायुतीच्या उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरला असून उमेदवारी अर्ज मागण्या घेतल्याने पक्षाविरुद्ध कामगिरी केल्यामुळे अजित पवार गटाकडून या आठ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांचाही समावेश आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे

1.बापू भेगडे प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

2.कृष्णा अंधारे जिल्हाध्यक्ष, अकोला ग्रामीण.

3.विश्वंभर पवार जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर.

4.पुजाताई व्यवहारे

5.ज्ञानेश्वर भामरे महिला जिल्हाध्यक्षा, जि. नांदेड (माजी जि. प. सदस्य) जि. धुळे

6.ममता शर्मा दहिसर तालुकाध्यक्षा, मुंबई

7=धनेंद्र तुरकर तुमसर तालुका अध्यक्ष, जि. भंडारा

8.आनंद सिंधीकर युवक प्रदेश सचिव, जि. नांदेड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0