Milind Narvekar : नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट
Milind Narvekar Visit Uddhav Thackeray Group : ठाकरे कुटुंबाकडून नार्वेकरांचे स्वागत, स्वीय सहाय्यक ते आमदार, उद्धव ठाकरे यांच्या सावलीसारखे साथीदार.
मुंबई :– विधान विधान परिषदेचे निकाल (Vidhan Parishad Election Result) जाहीर झाल्यानंतर 12 जागांपैकी 11 जागा विजय झाल्या असून एक जागा पराभूत झाले आहे त्या 11 जागेच्या निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवारांची अर्ज आले होते 12 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत सर्वात चर्चेचे जागा होती ती म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा विजय झाला आहे. मिलिंद नार्वेकर यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय झाला असून या विजयानंतर नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलून त्यांचे स्वागत केले आहे. ठाकरे कुटुंबाकडून नार्वेकरांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
उद्धवसेनेकडे 15 आमदार आहेत, त्यांच्या मिलिंद नार्वेकरांना आणखी 8 मते हवी होती. निवडणूक निकालानंतर त्यांना ही मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले नार्वेकर यांना 23 मते मिळाली आहेत. त्यांना विजयासाठी एका मताची गरज होती. अखेर दुसऱ्या पंसतीच्या मतांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. Maharashtra Vidhan Parishad Latest Update
मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती उघड केली आहे. दहावी पास असलेल्या नार्वेकर यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
नार्वेकरांनी आपल्या प्रतिज्ञापत्रा उल्लेख केलेला संपत्तीवरून चर्चा
नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये. याशिवाय त्यांच्याकडे 74 लाख 13 हजार रुपये बँकेच्या खात्यात जमा आहेत.
पत्नीच्या खात्यात 8 कोटी 22 लाख 118 रुपये आहेत. बॉण्ड्स किंवा म्युचअल फंडात 50 हजार रुपये आहेत. इतर पॉलिसीमधील गुंतवणूक ही 3 लाख 68 हजार 729 रुपये इतकी आहे. पत्नीची गुंतवणूक 67 लाख 88 हजार 558 रुपये आहे. त्यांच्यावर
वैयक्तिक कर्ज 26 लाख 38 हजार 160 रुपये इतके आहे. तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये इतके कर्ज आहे. त्यांच्यावर
1 कोटी 54 लाख 81 हजार 989 रुपये इतके बँकेचे लोन आहे. त्यांच्याकडे एकही गाडी नाहीये.71 लाख 28 हजार 189 रुपयांचे दागिने त्यांच्याकडे आहेत. तर पत्नीकडे 67 लाख 61 हजार 420 रुपये इतके दागिने आहेत. रत्नागिरीत मुरुडमध्ये त्यांच्याकडे 74.80 एकर जमीन आहे. मालाड आणि बोरिवलीमध्ये 1000 स्क्वेअर फुटांचं घर आहे. अलिबागमध्ये पत्नीच्या नावावर फार्महाऊस आहे. तर वैयक्तिक पगार, घराचं भाडं, व्यावसायिक मिळकत, विविध कंपन्यांच्या शेअर्स यातून ते कमाई करतात. Maharashtra Vidhan Parishad Latest Update