Maharashtra SSC Result : कोकण विभागाचा दहावीचा निकाल 99.01%
Maharashtra SSC Result : राज्यात माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर, पंधरा लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दहावीचा 95.81% निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण मंडळात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 99.01% असा लागल आहे.यंदा 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभाग आघाडीवर आहे. गतवर्षी हा निकाल 93.83% होता यंदा त्यात 1.78% टक्के वाढ झाली आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यातील दहावीचे विद्यार्थी त्यांचा निकाल https// mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतात.
नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21 टक्के आहे. तर 94.56 टक्के ही मुलांची उत्तीर्ण टक्केवारी आहे. याशिवाय 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीचा विभागनिहाय निकाल
- पुणे – 96.44%
- नागपुर – 94.73%
- छत्रपती संभाजीनगर – 95.19%
- मुंबई – 95.83%
- कोल्हापूर – 97.45%
- अमरावती – 95.58%
- नाशिक – 95.28%
- लातूर – 95.27%
- कोकण – 99.01%