महाराष्ट्र
Trending

Maharashtra Rain Update : पावसाची तडाखेबंद हजेरी; महाराष्ट्रात रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प”

Maharashtra Rain Update News : मुंबई, पुणे, ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; रेल्वे वाहतूक विस्कळीत,नागरिक हैराण

मुंबई :- महाराष्ट्रात मान्सूनने आपली खऱ्या अर्थाने एंट्री केली असून, अनेक शहरांवर पावसाचा अक्षरशः कहर कोसळला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आकाशातून कोसळणाऱ्या धरणीच्या जलधारांनी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं आहे. Maharashtra Latest Rain Update

रस्ते नद्या झालेत, स्टेशन तलाव झालेत, आणि लोकल गाड्या जलप्रलयात हरवल्यासारख्या वाटतायत. मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत; काही गाड्या उशिराने, तर काही रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर इतकं पाणी साचलं आहे की प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुणे, ठाणे आणि बारामती शहरांत मुख्य रस्ते जलमय झाल्यामुळे गाड्या रांगत रांगत पुढे सरकत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर “शहर की नदी?” असे पोस्ट करत पावसाच्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर; ठाणे व पालघरसाठी ऑरेंज अलर्ट आणि पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, नाशिक यांसाठी यलो अलर्ट जारी.
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील 3 ते 4 तास अत्यंत धोकादायक ठरू शकतात. ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा तडाखा आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासन सतर्क आहे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहेत. मात्र, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, सुरक्षित स्थळी रहावे, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0