Maharashtra Rain Update: नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग
Maharashtra Rain Update : हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे
मुंबई :- शनिवारपासून राज्यात नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. Maharashtra Rain Update मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून धरण तुडुंब भरले आहे.पावसामुळे शेतीचे देखील नुकसान झालं आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी पाण्यात अनेक जनावरंही वाहून गेली आहेत.
नांदेड जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं असून अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. जिल्ह्यतील 45 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. तर, छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 24 तासांत 71 मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आजही जोरदार बरसणार असल्याचा इशारा दिला आहे.
खानदेशमधील धुळे, नंदुरबार, जळगाव, विदर्भातील सर्वच्या सर्व 11 अर्थातच बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा या 19 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.